नोमान अली “द हिस्ट्री मॅन” Noman Ali “the history man”:

नोमान अली द हिस्ट्री मॅन. Noman Ali the history man. पाकिस्तान क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस. हॅट्रिक घेणारा पहिला पाकिस्तानी स्पिनर. जाणून घेऊया पाकिस्तान क्रिकेट मधील हॅट्रिक घेणारे सर्व बॉलर्स.

नोमान अली द हिस्ट्री मॅन; Noman Ali the history man

टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला पाकिस्तानी स्पिनर. नोमान अलीने पाकिस्तान व वेस्टइंडीज यांच्या सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इतिहास घडवला.

नोमान अली द हिस्ट्री मॅन. Noman Ali the history man.नोमान अली ने त्याचे नाव पाकिस्तान क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले. हिस्टरी मॅन, नोमान अली टेस्ट क्रिकेट मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला पाकिस्तानी स्पिनर ठरला. 38 वर्षीय नोमान ने हा बहुमान पाकिस्तान व वेस्टइंडीज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट मध्ये मिळवला. मुलतान येथे सुरू असलेले दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्याने हॅट्रिक घेऊन इतिहास रचला.

हॅट्रिक hat trick ; क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलर्स चे स्वप्न म्हणजे हॅट्रिक घेणे,

डावाच्या बाराव्या ओवरला Noman Ali नोमान अलीने वेस्टइंडीज ला मोठा धक्का दिला. त्याने लागोपाठ तीन बॉलवर जस्टिन ग्रीव्हस, ठेवीन लांबलाच आणि केविन सीनक्लेर यांना आऊट केले. ग्रीव्हसचा सेकंड स्लिप मध्ये बाबर आजम ने अप्रतिम झेल टिपला. त्याने तीन बॉल मध्ये एक रन काढला. लांबलाच ला नोमान अलीने पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू केले. तर सीनक्लेर चा झेल बाबर आजम ने पहिल्याच बॉलवर घेतला. पाहूया हॅट्रिकचा व्हिडिओ-

72 वर्षानंतर इतिहास घडला ;

सन 1952 साली पाकिस्तान संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. पाकिस्तान संघात आतापर्यंत अनेक दिग्गज स्पिनर होऊन गेले परंतु एकाही स्पिनरला तीन लागोपाठ बॉलवर विकेट घेऊन हॅट्रिक घेता आली नाही.

नोमान अलीने त्याच्या हॅट्रिकच्या जोरावर वेस्टइंडीज संघाला बॅक फुटवर आणले. त्याने पाहुण्या संघाचे अवघ्या 38 धावा देऊन सात विकेट बाद केले. या सामन्यात वेस्टइंडीज संघाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

मुलतान च मैदान फिरकी गोलंदाजी अनुकूल आहे. पाकिस्तान संघाने या सामन्यासाठी तीन स्पिनर व दोन फास्ट बॉलर संघात घेतले होते. या सामन्यात पाकिस्तान संघाने राईट आर्म पेसर काशीफ अली यास टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याची निवड खुर्रम शहजाद याच्या जागी करण्यात आली होती.

पदार्पणात उत्कृष्ट प्रदर्शन :

26 जानेवारी 2021 रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध पाकिस्तान टेस्ट टीम मध्ये नोमान अलीने पदार्पण केले होते. त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय विकेट दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टन क्विंटन डी कॉकच्या रूपाने घेतला. दुसऱ्या इनिंग मध्ये त्याने 35 रन देऊन पाच विकेट घेतले. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणात पाच विकेट घेणारा पाकिस्तानचा बारावा बॉलर बनला.

मार्च 2021 मध्ये त्याला झिंबाब्वे विरुद्ध आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. या सिरीजच्या दुसऱ्या टेस्ट मध्ये नोमान ने 97 रन बनवले. आणि आबिद अली सोबत 169 रणांची भागीदारी केली.

ऑक्टोबर 2024 मध्ये नोमान ला इंग्लंड विरुद्ध सिरीज मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टसाठी पाकिस्तानी टीम मध्ये शामील करण्यात आले. दुसऱ्या टेस्ट मध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये नोमान ने फर्स्ट इनिंग मध्ये 46 रन देऊन आठ विकेट आणि दोन्ही इनिंग मध्ये 147 रन देऊन 11 विकेट्स घेऊन आपल्या करिअरच्या सर्वश्रेष्ठ टेस्ट मॅच चे आकडे हासिल केले.

नोमान अलीचे क्रिकेट करियर :

नुमान अलीचा जन्म 7 ऑक्टोबर 1986 ला सिंध प्रांतात झाला. तो डाव्या हाताने बॅटिंग आणि डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करतो. त्याने 26 जानेवारी 2021 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या वयाच्या 34 व्या वर्षी डेब्यु केला. याचसोबत तो पाकिस्तान साठी सर्वात वयस्कर टेस्ट बेबी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनला. नोमान अली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्याआधी घरेलू क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली आहे. त्याने हैदराबाद, खान रिसर्च लॅबोरेटरीज, मुलतान सुलतान, nothern आणि कराची व्हाईट्स यासारख्या टीमकडून खेळला आहे. सन 2019 – 20 च्या कायद ए आझम ट्रॉफीमध्ये त्याने दहा मॅच मध्ये एकूण 54 विकेट घेऊन सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या बॉलर्सचा किताब मिळवला, 25 जानेवारी 2025 ला त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये हॅट्रिक घेऊन टेस्ट क्रिकेट इतिहासात हॅट्रिक घेणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. कमी वेळात आपल्या निरंतर प्रदर्शन आणि प्रभावशाली बॉलिंगच्या जोरावर तो पाकिस्तान टीम मधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू बनला आहे.

हॅट्रिक घेणारे इतर पाकिस्तानी खेळाडू;

पाकिस्तान टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एकूण चार बॉलरांनी हॅट्रिक घेतली आहे. त्यापैकी तीन बॉलर फास्ट बॉलर व एक स्पिनर आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे

Legend Wasim Akram

  • वसीम अक्रम :

वसीम अक्रम पाकिस्तान चे महान बॉलर पैकी एक आहे. त्यांना स्विमिंग सुलतान या नावाने सुद्धा ओळखले जाते. वसीम अक्रम पाकिस्तानसाठी टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये यादगार प्रदर्शन केलेले आहे तो क्रिकेट इतिहासात सर्वात सफल बॉलर पैकी एक आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन वेळा हॅट्रिक घेतली आहे.

पहिली हॅट्रिक:

वसीम अक्रम ने आपली पहिली हॅट्रिक 6 मार्च 1999 रोजी श्रीलंका संघाविरुद्ध लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम मध्ये घेतली होती. ही हॅट्रिक त्याच्या बेहतरीन स्विंग आणि तेज रफ्तार बॉलिंगचा परिणाम होता.

हॅट्रिकचे विवरण :

या हॅट्रिकमध्ये वसीम अक्रमने लागोपाठ तीन बॉल वर तीन बॅट्समनला आउट केले

  • पहिला विकेट – रोशन महानामा
  • दुसरा विकेट – निशांत कालूवितरना
  • तिसरा विकेट- प्रमोद या विक्रमशिंघे

ही हॅट्रिक वसीम अक्रम च्या करिअरमधील यादगार प्रदर्शन पैकी एक आहे.

दुसरी हॅट्रिक :

वसीम अक्रम आपली दुसरी टेस्ट हॅट्रिक 14 मार्च 1999 ला ढाका येथे वंगबधू नॅशनल स्टेडियम येथे श्रीलंका संघाविरुद्ध घेतली होती.

हॅट्रिकचे विवरण :

दुसऱ्या हॅट्रिक मध्ये त्याने लागोपाठ तीन बॉलवर आउट केलेले बॅट्समन

  • पहिला विकेट – चमिंडा वास
  • दुसरा विकेट – महिला जयवर्धने
  • तिसरा विकेट – नुवान जोईसा

या हॅट्रिक सोबतच वसीम अक्रम टेस्ट क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा विश्व क्रिकेट मध्ये पहिला बॉलर बनला. दोन्ही हॅट्रिक 1999 मध्ये आल्या हे वर्ष त्याच्या करिअर मधील सर्वोत्कृष्ट वसंत केली त्याच्या या उपलब्ध मुळेच त्याला जगातील खतरनाक तेच बॉलर्स मध्ये शामिल केले गेले.

Abdul razzak the greatest all rounder for Pakistan

  • अब्दुल रज्जाक :

पाकिस्तानचा अब्दुल रजाक आपल्या स्विंग बॉलिंग साठी प्रसिद्ध होता. त्याने सुद्धा टेस्ट क्रिकेटमध्ये एक हॅट्रिक घेतली असून त्याच्या या हॅट्रिकने त्याला पाकिस्तानच्या महान ऑल राऊंडरच्या श्रेणीमध्ये नेऊन ठेवले. अब्दुल रज्जाक ने 28 फेब्रुवारी 2000 रोजी श्रीलंका येथे गाल इंटरनॅशनल स्टेडियम येथे पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात केल्या गेल्या टेस्ट मॅच मध्ये हॅट्रिक घेतली.

हॅट्रिक चे विवरण :

अब्दुल रज्जाक ने लागोपाठ तीन बॉलवर श्रीलंका बॅट्समनला आउट केले.

  • पहिला विकेट : रोशन महानामा
  • दुसरा विकेट : रुवान कलपगे
  • तिसरा विकेट : चमिंडा वास
  • मोहम्मद सामी :

पाकिस्तान संघासाठी टेस्ट क्रिकेट मध्ये हॅट्रिक घेणारे तिसरे बॉलर आहेत मोहम्मद सामी. मोहम्मद सामी आपल्या तेज तर्रार बॉलिंग आणि यॉर्कर साठी प्रसिद्ध होते. आठ मार्च 2002 ला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात गद्दाफी स्टेडियम, लाहोर येथे सुरू असलेल्या टेस्ट मॅच मध्ये हॅट्रिक घेऊन सामीने इतिहास घडवला.

हॅट्रिक चे विवरण :

  • पहिला विकेट : दानुष्का गुणरत्ने
  • दुसरा विकेट : कुमार संघकारा
  • तिसरा विकेट : धर्मसेना

Nasim Shah (नसीम शाह):

नसीम शाह पाकिस्तान संघासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा चौथा बॉलर ठरला. त्याने फक्त सोळाव्या वर्षी हॅट्रिक घेऊन इतिहास रचला. टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा नसीम शाह सर्वात कमी वेळेचा खेळाडू आहे. 9 फेब्रुवारी 2020 ला राहुल पिंडी क्रिकेट स्टेडियम येथे पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील असलेल्या टेस्ट मॅच मध्ये त्याने हा कारनामा केला. नसीम ने त्याच्या बॉलिंगमध् गती स्विंग आणि अचूक टप्पा यांचे अद्भुत प्रदर्शन केले. या हॅट्रिकने नसीमला न केवळ क्रिकेट इतिहास मध्ये जागा मिळवून दिली परंतु हा पाकिस्तान क्रिकेट साठी एक गर्वाचा क्षण देखील होता.

हॅट्रिक चे विवरण :

  • पहिला विकेट – नजमूल हुसेन शांतो
  • दुसरा विकेट – तैजुल इस्लाम
  • तिसरा विकेट – महमदुल्लाह

क्रिकेटमध्ये हॅट्रिक चे महत्व :

हॅट्रिक (hat-trick) क्रिकेटमध्ये एक बॉलर साठी अत्यंत महत्वपूर्ण आणि दुर्लभ उपलब्ध मानले जाते. हे तेव्हा होते जेव्हा एखादा बॉलर लागोपाठ तीन बॉलवर तीन बॅट्समनला आउट करतो. हॅट्रिकचे महत्त्वाचे कारण खालील प्रमाणे:

  • दुर्लभ उपलब्धि :

हॅट्रिक क्रिकेट घेणे हे क्रिकेटमधील एक दुर्लभ आणि असाधारण प्रदर्शन आहे. यामध्ये बोलरला फक्त आपली स्किल दाखवायची नसते तर ग्राउंड वरील परिस्थिती आणि दबावही सांभाळायचं असतं

  • बॉलरच्या योग्यतेचे प्रतीक :

हॅट्रिक बॉलरची टेक्निक मानसिक मजबुती आणि योजनेचा परिणाम आहे. हॅट्रिक दाखवते की बॉलर बॅट्समनला लगा तर तीन बॉलवर चकमा देण्यात सक्षम आहे.

  • मॅचचा रिझल्ट बदलण्याची क्षमता :

हॅट्रिक नेहमीच मॅच मध्ये एक रोमांचक स्वरूप आणते. तीन विकेट एकाच वेळी आऊट होणे विरोधी टीमवर जबाब वाढतो आणि मॅच चे संतुलन बॉलिंग टीम कडे झुकले जाते.

  • इतिहासात नाव नोंद होणे :

हॅट्रिक घेणाऱ्या बॉलरचे नाव कायमस्वरूपी रेकॉर्ड आणि इतिहासात नोंदले जाते. ही उपलब्ध प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये त्याच्या प्रतिष्ठेला चालना देते.

  • फॅन्स आणि दशकांसाठी एक रोमांचक क्षण :

हॅट्रिक दर्शकांसाठी एक रोमांचक क्षण असतो. मैदानावर किंवा टीव्ही समोर बसणारा प्रत्येक दर्शक हॅट्रिकने रोमांचित होतो. हॅट्रिक क्रिकेट खेळाच्या प्रत्येक कत्रात बॉलिंग टीमरन नीती आणि दशकांच्या मनोरंजन ला एका उंचीवर नेऊन ठेवतो. हेच कारण आहे की क्रिकेटमध्ये हॅट्रिक एक खास आणि यादगार उपलब्ध मानली जाते.