Diabetes(मधुमेह) म्हणजे काय ?

मधुमेह Diabetes हा आजार प्राचीन काळापासुन या जगात अस्तित्वात आहे. प्राचीन काळी त्याला अति लघवीचा आजार म्हणुन ओळखले जात होते.परंतु सन 1674 साली टाँमस विलीस या  शास्त्रज्ञाने यावर संशोधन केले त्यावेळी त्यांना मधुमेह Diabetes च्या रुग्णाची लघवी गोड असल्याचे आढळुन आल्याने त्यांनी मधुमेहाला Diabetes Mellitus  असे नाव दिले.

Diabetes याचा अर्थ वाटु लागणे व Mellitus याचा अर्थ मधासारखा गोड असा होतो.

सन 1869 साली पाँल लँगरहन्स यांनी पॅनक्रीयाज मधील इन्सुलीन तयार करणा-या पेशींचा शोध लावला

सन 1921 साली फ्रेडरीक बँटींग व चार्ल्स बेस्ट यांनी सर्वप्रथम इन्सुलिनचा शोध लावला व त्यांच्या या शोधासाठी त्यांना 1923 मध्ये नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.इन्सुलिनच्या शोधामुळे मधुमेहावर उपचार शक्य झाले व आजपावेतो लाखो लोकांचे प्राण वाचविणे शक्य झाले.त्यामुळे वरील दोन्ही शास्रज्ञांचे इतीहासात अत्यंत महत्वाचे योगदान आहे.

Table of Contents


Diabetes (मधुमेह) हा एक अत्यंत गंभीर आहे. आपल्या भारत देशात Diabetes (मधुमेह) हा झपाट्याने वाढत असुन जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने भारताला मधुमेह या आजाराची राजधानी (Capital Of Diabetes) असे संबोधले आहे. भारतातील एकुण लोकसंख्येच्या सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराने प्रभावीत आहेत असे सन 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) च्या अहवालात नमुद आहे.


आपल्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण (Glucose) वाढते व स्वादुपिंड (Pancreas) शरीरास आवश्यक त्या प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर न करु शकल्यामुळे होतो. Diabetes (मधुमेह) हा सर्व वयाच्या लोकांमध्ये होऊ शकतो. मधुमेह कायमचा बरा करणे सध्या तरी शक्य झाले नसुन वैद्यकीय उपचारांनी, योग्य जिवनशैली व व्यायामाने त्याच्यावर नियंत्रण ठेवु शकतो.


TYPES OF DIABETES (मधुमेहाचे प्रकार )

TYPE 1 DIABETES –

  • या प्रकाराला बाल मधुमेह (Child Diabetes) असेही म्हणतात.
  • हा प्रकार मुख्यत्वे लहान मुलांमध्ये होतो.
  • या प्रकारात आपली रोगप्रतीकारक प्रणाली
  • इन्सुलिन निर्माण करणा-या पेशींवर हल्ला करुन त्यांना नष्ट करतात.
  • सुमारे 10 टक्के लोक या प्रकाराने ग्रस्त आहेत.
  • मुख्यत्वे हा आजार लहान व किशोरवयीन मुलांमध्ये दिसुन येतो
  • TYPE 2 DIABETES –
  • या प्रकारात आपल्या शरीरात पुरेश्या प्रमाणात इन्सुलीन निर्माण होत नाही किंवा शरीरातील पेशी तयार झालेल्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत.
  • TYPE 2 Diabetes हा सामान्य (मुख्य) प्रकारचा आजार आहे.
  • हा प्रकार मुख्यत्वे पौढ लोकांमध्ये दिसुन येतो परंतु लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो.

Gastational DIABETES – ( गर्भाअवस्थेत होणारा मधुमेह)

  • या प्रकारचा मधुमेह हा काही महीलांना गर्भधारणा अवस्थेत असतांना होतो.
  • सदरता आजार शक्यतो बाळंतपणानंतर निघुन जातो पंरतु काही केसेसमध्ये महीलांना टाईप 2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता असते.
  • MODY (मँच्युरीटी – आँनसेट डायबीटीस आँफ द यंग)
  • हा एक अनुवांशिक प्रकारचा मधुमेह आहे.
  • हा मधुमेह लहान वयात होतो
  • हा मधुमेह टाईप 2 मधुमेह सारखाच असतो.

मधुमेह होण्याची कारणे-  (Causes of Diabetes )

Type 1 diabetes –  सदर आजार हा आनुवांशितेने होतो. कुटुंबातील सदस्यास असल्यास  धोका जास्त असतो.

शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली (Immune System) पँनक्रियाज मध्ये इन्सुलिन निर्माण करणा-या पेशींवर हल्ला करते

विषाणु संसर्ग झाल्यास हा आजार होऊ शकतो.

Type 2 diabetes – एखाद्या इसमाच्या कुटुंबात diabetes (मधुमेहाचा) इतिहास असल्यास या प्रकाराचा धोका अधिक असतो.

शरीराचे वजन जास्त प्रमाणात वाढणे – शरीराचे वजन जास्त प्रमाणात वाढल्याने अतिरिक्त चरबीमुळे शरीरात इन्सुलिनचा पाहीजे त्या प्रमाणात काम करत नाहीत व त्याचा प्रभाव कमी झाल्याने

आनुवांशिकता– आनुवांशिकता हे Type 2 diabetes (मधुमेह) होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक मुख्य कारण आहे.

चुकीची जिवनशैली– आजच्या धावपळीच्या जिवनात शारीरिक हालचाल व व्यायाम होत नसल्याने तसेच फास्ट फुडचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने (असंतुलित आहार) या कारणाने सुद्धा Type 2 diabetes (मधुमेह) होण्याचे कारण आहे.

वय – मागील 10 वर्षापुर्वी फक्त वयस्कर लोकांमध्ये Type 2 diabetes (मधुमेह) दिसुन येत होता परंतु वरील कारणांमुळे हा आजार तरुणांमध्येही आढळत आहे.

गर्भावस्थेतील मधुमेह (Gastation Diabetes)

हार्मोनल बदल (Hormonal Change)- महीला गरोदर असतांना तिच्या शरीरात होत असलेल्या बदलांमुळे हार्मोनल असमतोल होतात त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडते.

मधुमेहाचा पुर्वेतिहास – गरोदर महीलेस आधीच्या गरोदरपणात गर्भावस्थेतील मधुमेह (Gastation Diabetes)झालेला असल्यास तिस पुन्हा होण्याचा धोका जास्त असतो.

वजन वाढणे-गरोदरपणात शरीराचे वजन जास्त प्रमाणात वाढल्यास गर्भावस्थेतील मधुमेह (Gastation Diabetes) धोका वाढतो.

मधुमेह Diabetes होण्याची सामान्य कारणे –

आनुवांशिकता- कुटुंबात एखाद्यास मधुमेह असल्यास diabetes (मधुमेह) होण्याचा धोका वाढतो.

असंतुलित आहार (Unhealty Food)

नेहमीच आपण असंतुलित आहार घेत राहीलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊन रक्तातील साखर कंट्रोल (Blood Sugar Control) बिघडते व शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स निर्माण होऊन Type 2 diabetes होण्याची शक्यता निर्माण होते.

असंतुलित आहारीत घटक कोणते ?

साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ (High Sugar Containing Food )

रोजच्या जिवनात आपण नेहमी केक, मिठाई, सोडा, साँफ्ट ड्रिंक्स, चाँकलेट, कँडबरी यासारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन करतो. वरील सर्व पदार्थ हे  साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ (High Sugar Containing Food ) आहेत.

साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ (High Sugar Containing Food ) आपण सतत व नेहमी सेवन केले तर रक्तातील साखर (Blood Sugar)प्रमाण वाढुन इन्सुलिन सतत निर्माण होत असल्याने कालांतराने शरीरात इन्सुलिन  प्रतिरोधकता (Resistsnce) निर्माण होतो.

मैद्याचे पदार्थ – ब्रेड,पाव, पास्ता, बिक्कीटे यासारखे मैद्याचे पदार्थ वारंवार खाल्याने ते रक्तातील साखरेचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढवतात.

जास्त तेलकट  व तळलेले पदार्थ सेवन केल्याने – जास्त तेलकट व तळलेले पदार्थ खाल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (Fat) साचुन लठ्ठपणा वाढतो व यामुळे Type 2 diabetes होण्याचा धोका निर्माण होतो

जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाल्याने – जास्त प्रमाणात मीठ खाल्याने आपल्या शरीरात उच्च रक्तदाब (High Blood Pressure) निर्माण होतो व त्यामुळे Type 2 diabetes होण्याचा धोका निर्माण होतो.

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ – पँकेटमधील स्नॅक्स, वेफर्स, यासारख्या पदार्थात मीठ व साखर मोठ्या प्रमाणात वापरलेली असते. शरीरासाठी मीठ व साखरेचे जास्त प्रमाण हानिकारक असते.

अति प्रमाणात दारु व साँफ्ट ड्रिक्सचे सेवन – दारुमध्ये मोठ्या प्रमाणात कँलरीज असतात व साँफ्ट ड्रिंक्समध्ये साखर असते त्यामुळे आपल्या शरीरात लठ्ठपणा व रक्तातील साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

Diabetes (मधुमेहाची ) सामान्य लक्षणे –

वारंवार लघवीला येणे – मानवी शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वाढले तर रक्तातील जास्त साखर किडनीद्वारे लघवीतुन बाहेर टाकली जाते त्यामुळे रुग्णाला वारंवार लघवीला जावे लागते.

जास्त तहान लागणे – रक्तातील जास्त साखर किडनीद्वारे लघवीतुन बाहेर टाकली जात असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे रुग्णाला वांरवार तहान लागते.

जास्त भुक लागणे – रक्तातील जास्त साखर लघवीद्वारे वारंवार बाहेर जात असल्याने शरीरात ऊर्जा कमी होत असल्याने रुग्णाला मोठ्या प्रमाणात भुक लागते.

वजन कमी होणे – शरीरात इन्सुलिनचा वापर योग्य प्रकारे होते नसल्याने शरीरातील चरबी व स्नायुंचे वजन झपाट्याने कमी होते.

थकवा व अशक्तपणा – शरीराला ऊर्जा कमी प्रमाणात मिळत असल्याने रुग्णाला सतत थकल्यासारखे व अशक्तपणा जाणवतो.

जखमा लवकर ब-या न होणे – शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे होणा-या जखमा लवकर ब-या होत नाहीत व त्याना ब-या होण्यास वेळ लागतो.

त्वचेच्या समस्या- त्वचा कोरडी होणे, त्वचेवर खाज सुटणे व त्वचेवर डाग पडणे ही लक्षणे दिसतात.

डोळ्यांना कमी दिसणे – डोळ्यांवर परिणाम होऊन धुसर दिसण्याचे लक्षणे दिसतात.

Type 1 Diabetes (मधुमेहाची ) विशेष लक्षणे ज्ञ्

खुप भुक लागते व जास्त प्रमाणात जेवन करुनही शरीराचे वजन कमी होते.

उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास होतो.

Type 2 Diabetes (मधुमेहाची ) विशेष लक्षणे

हातपाय बधीर होणे किंवा वारंवार मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसतात.

वारंवार त्वचा कोरडी होणे, त्वचेवर खाज सुटणे व त्वचेवर डाग पडणे ही लक्षणे दिसतात.

गर्भारपणातील Diabetes (मधुमेहाची ) विशेष लक्षणे –

शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शारिरीक थकवा व वारंवार लघवी व तहान लागण्याची लक्षणे दिसतात.

Diabetic (मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी)

योग्य आहार घेणे – हिरव्या पालेभाज्या,कडधान्ये, प्रोटीन व फायबरयुक्तस अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

साखर व कार्बोहायड्रेट यांचेवर नियंत्रण ज्ञ् साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ, तांदुळ व मैद्याचे पदार्थ शक्यतो घेऊ नये

नियमित वेळेवर जेवण करणे – जेवणाची दररोज एक नियमित वेळ ठरवुन त्या वेळेस जेवण करावे व उपाशी राहु नये. दिवसातुन 4 ते 5 वेळा थोडे थोडे खावे.

पुरेश्या प्रमाणात पाणी प्यावे – योग्य व पुरेश्या प्रमाणात पाणी पिल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते

शारिरीक हालचाली किंवा व्यायाम

दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करणे जसे कि, चालणे  सायकलींग, योगासने यांसारखे व्यायाम करायलाय पाहीजे.

वजन – शरीराचे वजन नियंत्रीत ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

औषधे व वैद्यकीय तपासणी ज्ञ्

डाँक्टरांनी सांगीतल्याप्रमाणे योग्य वेळी औषधांचे सेवन करणे व शारिरीक तपासणी करणे

रक्तातील साखरेचे प्रमाणे व बी.पी. नियमितपणे तपासावे

डोळे व पायांची तपासणी – नियमितपणे डोळ्यांचे आरोग्य व हातापायांवर जखम होणार नाही याची काळजी घ्यावी

ताणतणाव व्यवस्थापन

ताणतणाव शक्यतो कमी ठेवा त्यासाठी योगासन, ध्यानधारणा व श्वसनाचे व्यायाम करा.

पुरेशी झोप घेणे आवश्यक – दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे

वाईट सवयी सोडा-

मद्यपान व धुम्रपान यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो त्यामुळे या सवयींना टाळणे महत्वाचे आहे

do not drinks
do not drinks

पायांची विशेष काळजी घ्यावी- पाय नेहमी स्वच्छ ठेवा तसेच कोरडे ठेवा

जखम किंवा जळजळ झाल्यास तात्काळ आपल्या डाँक्टरांचा सल्ला घ्यावा

जास्त फिट असलेले शुज किंवा चप्पल घालु नये

वरील नियमांचे पालन केल्यास डायबीटीस नियंत्रणात राहुन   आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.