ॲसिडीटी (Acidity)

 कधी कधी आपले पोटात जळजळ झाल्यासारखे वाटते, त्याला आपण ॲसिडीटी (Acidity )म्हणतो. ॲसिडीटी (Acidity ) कधी कधी अनेक कारणांनी होऊ शकते.त्यामध्ये सगळ्यात सामान्य कारण म्हणजे अवेळी जेवण, जास्त मसालेदार पदार्थ खाणे आणी खुप चहा किंवा कॉफी पिणे हे आहेत.परंतु ॲसिडीटी (Acidity ) साठी आणखी दुस-या कारणांनी सुद्धा होऊ शकतो. ॲसिडीटी (Acidity ) झाल्यास केळी, ओटमील व दही यांसारखे पदार्थ खाल्ल्याने आराम मिळतो. याने छातीतील जळजळ व बेचैनी कमी होण्यास मदत होते.हा ब्लॉगमध्ये आपल्याला आपल्या पोटाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी कोण कोणते खाद्यपदार्थ खावेत व कोणते टाळावेत यासंबंधी माहीती मिळेल.

ॲसिडीटी (Acidity ) मध्ये आराम मिळण्यासाठी मुख्य खाद्य पदार्थ : काय खावे आणी काय टाळावे

ॲसिडीटीला (Acidity ) नियंत्रीत करण्यासाठी आपल्या नेहमीच्या आहारातील खाद्य पदार्थांची महत्वाची भुमीका असते. संपुर्ण धान्य, भाजीपाली तसेच फायबरयुक्त खाद्यपदार्थ व त्यासोबतच लीन प्रोटीन,अदरक, अंड्यातील सफेद भाग, मध, सौफ, मलाईदार सुप, आणी इतर काही पेये ॲसिडीचीची लक्षणे कमी करु शकतात. परंतु कैफीन, कार्बोनेटेड पेय, आंबट फळे, मद्य, चॉकलेट व तळलेले पदार्थ यांना रोजच्या आहारात खाण्यापासुन टाळणे महत्वाचे आहे. सैलसर कपडे घालणे, जेवण करतांना हळु हळु खाणे, मद्यपान न करणे, धुम्रपान न करणे, यासारख्या सवयी आपणास ॲसिडीटी रोखण्यासाठी मदत करु शकतात. वारंवार लक्षणे दिसल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोणते खाद्यपदार्थ शरीरातील आम्लता नियंत्रित करण्यासाठी मदत करतात ?

 रोजच्या आहाराची ॲसिडीटी (Acidity ) रोखण्यासाठी खुप महत्वाची भुमिका असते. काही खाद्यपदार्थ ॲसिडीटीला नियंत्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे ओळखले जातात. नैसर्गिक अन्नधान्य (Unprocceced Grains) फळ आणी हिरव्या पालेभाज्या सहीत उच्च फायबरयुक्त खाद्य पदार्थ ॲसिडीटीमध्ये (Acidity ) आराम मिळण्यासाठी व पचनशक्ती वाढवण्यासाठी सर्वात चांगले मानले जातात.  

   चिकन व मासे हे कमी फॅटयुक्त अन्नपदार्थ मांसच्या तुलनेत शरीरात लवकर पोहोचतात व पचतात. केळी व टरबुज सारखे क्षारीय खाद्यपदार्थ पोटातील ॲसिडला नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ॲसिडीटी (Acidity ) होण्याची शक्यत कमी होते. दहीसुद्धा पोटातील आम्लता कमी करण्यासाठी एक महत्वाचा पदार्थ त्यामध्ये असणारे प्रोबायोटीकयुक्त खाद्यपदार्थ आम्लता कमी करतात.त्यामुळे पोटातील आतड्याचे आरोग्य सुधारते.त्याव्यतीरिक्त कैमोमाईल आणी अदरक सारखे पदार्थांमुळे सुद्धा ॲसिडीटी मध्ये आराम मिळतो.

ॲसीडीटी (Acidity ) पासुन बचाव करण्यासाठी कोणते खाद्य पदार्थ खावेत?

पालेभाज्या :

आपल्या भारत देशात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जातो.पालेभाज्या मानवी शरीरात अनेक पोषक घटक देतात. काही पालेभाज्या ह्रदयाची कार्यप्रणाली चांगली राहावी तसेच त्यासंबंधी आजाराचे प्रमाण कमी करु शकतात. तसेच पालेभाज्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीरातील आम्लता कमी करुन ॲसीडीटीचा धोका कमी करतात.

आंबट नसलेली फळे :

फळे आवश्यक पोषणतत्वांनी युक्त असतात. सफरचंद, केळी, नासपाती,टरबुज यांसारखी फळे ॲसिडीटीमध्ये (Acidity )आराम देतात. या फळात फॅटची मात्रा अत्यंत कमी असते व यामध्ये फायबरसुद्धा मोठ्या प्रमाणात असते.

अदरक :

 अदरक मध्ये सर्व आवश्यक एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. म्हणुन अदरकचे सेवन केल्यास  ॲसिडीटीमध्ये (Acidity )आराम मिळतो.हा एक प्राकृतीक उपचार असुन प्राचीन काळी याचा उपयोग करत होते. याशिवाय अदरक अपचन, पोटातील गॅस कमी करण्यासाठी मदत करतो. परंतु कृपया काही लोकांना अदरकची ॲलर्जी असल्यास आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अंडे :

अंड्यातील सफेद भाग कमी फॅटयुक्त असते.यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात आम्लता असते त्यामुळे ॲसिडीटी (Acidity ) मध्ये हा एक महत्वाचा खाद्यपदार्थ आहे. यामध्ये असलेल्या कैल्शीयममुळे पचनशक्ती वाढविण्यास सुद्धा मदत करते.

 कमी फॅट असणारे मांस व मासे :

कमी प्रमाणात फॅट असलेले मांस व मासे शरीरातील आम्लीय प्रवृत्तीला कमी करण्यात महत्वाची भुमिका बजवितात. याशिवाय यांच्यात फॅट अत्यंत कमी प्रमाणात असते.त्यामुळे ते आम्लता कमी करतात.

पेय : ॲसिडीची कमी करण्यासाठी मद्यपान, गोड व कॅफीनयुक्त पेय टाळणे आवश्यक आहेत.आपण नारळ पाणी किंवा गाजर रस यासारखे पेय घेऊ शकता.

मध – मधात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट आणी अँटीइम्फ्लामेबल गुण असतात त्यामुळे ॲसिडीटी पासुन आराम मिळतो.

सफरचंद

अँसिडीटी (Acidity )मध्ये सफरचंद सारखी फळे खाल्याने आपल्या शरीरातील पी.एच.लेवल संतुलीत होऊन आराम मिळतो.सफरचंद मध्ये कमी आम्ल व फायबर मोठ्या प्रमाणात असतात.ते आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

केळी-

केळी एक कमी आम्लीय फळ आहे.म्हणुन त्याचे सेवन केल्याने पोटातील ॲसिड कमी करण्यास मदत करते. व पोटातील गॅसचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

काकडी

ॲसिडीटीमध्ये काकडी एक अत्यंत महत्वाचा खाद्यपदार्थ आहे.काकडी मध्ये शरीरातील आम्लीयता कमी करण्याची शक्ती असुन काकडी खाल्याने पोटात आराम मिळतो.

नारळ पाणी -नारळ पाणी पोटातील ॲसिडचा प्रभाव नष्ट करुन पोटात आराम मिळतो. नारळ पाणी शरीरातील जास्त असलेल्या आम्लतेला संतुलित करण्यास मदत करते.तसेच पोटातील गॅसेसमध्येही आराम मिळतो.

अँसिडीटी acidity पासुन बजाव करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत

काही अन्नपदार्थ व पेय शरीरात अँसिडीटीचे प्रमाण वाढवतात. त्यांना शक्यतो रोजच्या जिवनात टाळावेत ते खालील प्रमाणे आहेत

कैफीन युक्त पेय – कैफीनयुक्त पेयांचे अति प्रमाणात सेवन केल्याने अँसिडीटी होऊ शकते ( चहा, काँफी, एनर्जी डिेक्स इ.)

आंबट फळे – आंबट फळे जसे की, लिंबु, संत्रा इत्यादी फळे सर्वात जास्त  प्रमाणात अँसिडचे प्रमाण असते त्यामुळे अँसिडीटी मध्ये शक्यतो आंबट फळे खाऊ नयेत

मद्यपान –  अँसिडीटी होण्याचे अति प्रमाणात मद्यपान करणे हे एक प्रमुख कारण आहे. अँसिडीटीचा त्रास असणा-या इसमांनी शक्यतो दारु पुर्णपणे बंद केलेले आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

चाँकलेट- चाँकलेटमध्ये असणारे कँफीन व थियोब्रोमाईन या सारखे घटन अँसिडीटीचे प्रमाण वाढविण्यास कारणीभुत ठरतात.

फँटयुक्त व तळलेले पदार्थ – फँट आपल्या शरीरात पचण्यास उशिर लागतो व ते पचण्यास जड असल्याने पचनसंस्थेवर  ताण पडतो.त्यामुळे तळलेले व पदार्थ व फँटयुक्त पदार्थ आपल्या आहारात योग्य प्रमाणातच घ्यावेत.

अँसिडीटी (Acidity )पासुन बचाव करण्यासाठी आपल्या जिवनशैलीत काय बदल करावेत?

सैलसर कपडे घालावेत – सैलसर कपडे घातल्याने आपल्या पोटावर पडणारा दाब कमी होतो त्यामुळे सैलसर कपडे घालावेत

जेवण करतांना सावकाश खा – जेवण करतांना नेहमी सावकाश व चावुन चावुन खावे ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचुन अँसिडीटीचा त्रास होणार नाही.

अति प्रमाणात खाणे टाळावे – अति प्रमाणात खाण्याचे प्रमाण असल्यास पोटात पचन व्यवस्थित होत नसल्याने अँसिडीटीचे प्रमाण वाढते. जेवण नेहमी योग्य त्या प्रमाणात खाल्ले पाहीजे

मद्यपान टाळावे – अँसिडीटी रोखण्यासाठी दारुचे सेवन करु नये

धुम्रपान करु नये – अँसिडीटीची समस्या रोखण्यासाठी धुम्रपान बंद करणे गरजेचे आहे. धुम्रपान केल्याने शरीरातील अँसिड रिफ्लेक्स खराब होते

निष्कर्ष – अँसिडीटी होण्याची तीन मुख्य कारणे आहेत- अवेळी व अयोग्य जेवण करणे, अति प्रमाणात मद्यपान करणे व धुम्रपान करणे. आम्लीय पदार्थांचा पी.एच.४.६ पेक्षा कमी असतो त्यामुळे त्यांच्या सेवनाने शरीरात त्रास वाढु शकतो. आम्लीय पदार्थांत असलेल्या काही कतरतेंमुळे आपल्याला पोटात दुखणे, छातीत जळजळ,भुख न लागणे अश्या प्रकारची लक्षणे उद्भवतात.