India versus England ODI series 2025

(India versus England ODI series 2025) भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच t-20 मॅचची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत पाहुण्या इंग्लंड संघाचा 4-1 असा पराभव केला. आणि t- 20 मॅचेस मध्ये आपला दबदबा कायम ठेवला. या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सहभागी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी चे यजमानपद जरी पाकिस्तान कडे आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षा कारणावरून भारत सरकारने बीसीसीआय ला आपला संघ पाकिस्तान मध्ये पाठवण्यास परवानगी दिली नाही. यास्तव भारतीय संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्वसामान्य दुबई येथे होणार आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज महत्वपूर्ण का आहे?

सन 2024 मध्ये भारतीय संघाने केवळ तीन वनडे मॅचेस खेळल्या. त्यामध्ये संघाला एकही विजय मिळवता आला नाही. तिन्ही सामने श्रीलंके विरुद्ध खेळले. त्यापैकी दोन सामन्यात पराभव झाला व एक सामना अनिर्णित राहिला. मागील अनेक महिन्यांपासून भारताने एक दिवसीय सामना केलेला नाही. India versus England ODI series 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी च्या आधी भारतीय संघाला सरावाची संधी मिळेल. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली नाही. या मालिकेत चांगली कामगिरी करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आत्मविश्वासाने उतरण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तसेच दुखापतीमुळे बरेच महिने क्रिकेटपासून लांब असलेला मोहम्मद शमी याचे पुनरागमन झाले आहे. त्याला सुद्धा तीन सामन्यात सरावाची संधी मिळेल.

India versus England ODI series 2025 भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांचे वेळापत्रक:

  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला एक दिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर होणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे.
  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा एक दिवसीय सामना 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना कटक येथील बाराबती मैदानावर होणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे.
  • भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा एक दिवसीय सामना 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे.

भारताने आणि इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय सिरीजचे वेळापत्रक. source: Facebook; cricket world

भारत संघाचे सध्याचे प्रदर्शन:

2023 – 24 या वर्षात भारतीय संघाचे एक दिवसीय आणि टी ट्वेंटी मॅचेस मध्ये प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. सन 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्व कप मध्ये फायनल पर्यंत मजल मारली परंतु ऑस्ट्रेलिया कडून हार पत्करावी लागली. परंतु 2024 मध्ये टी ट्वेंटी विश्व कप मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने दुसऱ्यांदा t20 विश्व कप जिंकला. तसेच पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडचा 4-1 असा पराभव केल्याने आगामी सिरीज मध्ये भारतीय संघाचे पारडे नक्कीच जड असणार आहे.

इंग्लंड संघाचे सध्याचे प्रदर्शन :

इंग्लंडच्या इंग्लंडच्या संघाने टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका 4-1 ने गमावल्या नंतर त्यांना एक दिवसीय सामन्यात पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन एक दिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्माबॅटर (कॅप्टन )
शुभमन गिल बॅटर
श्रेयस अय्यरबॅटर
यशस्वी जयस्वालबॅटर
विराट कोहलीबॅटर
हार्दिक पांड्याऑल राऊंडर
रवींद्र जडेजाऑल राऊंडर
अक्षर पटेलऑल राऊंडर
ऋषभ पंतविकेट कीपर
के. एल. राहुलविकेट कीपर
अर्शदीप सिंगबॉलर
हर्षित राणाबॉलर
मोहम्मद शामीबॉलर
कुलदीप यादवबॉलर

भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ:

हॅरी ब्रुकबॅटर
बेन डकेटबॅटर
जो रूटबॅटर
जेकब बेथेलऑल राऊंडर
लियम लिविंगस्टोनऑल राऊंडर
जोश बटलरकॅप्टन (विकेट कीपर)
फीलीप सॉल्टविकेट कीपर
जेमी स्मिथविकेट कीपर
ब्रायडन कार्सबॉलर
जेमी ओवर्टनबॉलर
जॉफ्रा आर्चर बॉलर
गस एटकिन्सन बॉलर
साकिब मेहमूदबॉलर
आदिल रशीदबॉलर
मार्क वूडबॉल

https://www.cricbuzz.com/cricket-series/8402/england-tour-of-india-2025/squads

भारताचे प्रमुख खेळाडू :

  • यशस्वी जयस्वाल : भारतीय संघाच्या ओपनर यशस्वी जयस्वाल वर सर्वांची नजर असेल. सन 2024 या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या या युवा खेळाडूने 11 कसोटी सामन्यात 21 डावात 52.08 च्या सरासरीने 1771 धावा केल्या आहेत. त्यामध्ये तीन शतक आणि अकरा अर्धशतकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत त्याने कसोटी सामन्यात 359 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल यांना अजून एक दिवसीय सामन्यात पदार्पण केलेले नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर असतील.
  • शुभमन गिल: भारतीय संघाचा युवा खेळाडू शुभमन गिल याची कामगिरी 2024 मध्ये फारशी चांगली झाली नाही. म्हणून त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळाली नाही. 2024 मध्ये शुभमन गिल ने दहा कसोटी सामन्यात 805 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन शतक व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. शुभमन गिल हा भारताच्या प्रमुख खेळाडूंची एक असून त्याची चांगली कामगिरी भारताच्या विजयात महत्त्वाचे ठरेल.
  • विराट कोहली: भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली याची 2024 मध्ये कामगिरी अतिशय निराशा जनक राहिलेली आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 2024 हे वर्षात काम गिरी सर्वात खराब राहिली आहे. विराट कोहली 2024 मध्ये फक्त शतक आणि एक अर्धशतक केले. त्याने 24.52 चे सरासरी ने फक्त 417 धावा केल्या. नाबाद 100 ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी होती. भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची असेल तर इंग्लंड विरुद्धच्या तीनही सामन्यांत विराट कोहलीला चांगले प्रदर्शन करत आपला फॉर्म परत आणावा लागेल.

रोहित शर्मा:

भारताचा कसोटी आणि एक दिवसीय कॅप्टन रोहित शर्मा यांनी 2024 मध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामने मिळून एकूण 28 सामने खेळले. 31.10 च्या सरासरीने एकूण 1154 धावा केल्या. त्यात त्याने तीन शतक आणि सात अर्धशतकीय खेळ्या केल्या. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत 6.20 च्या सरासरीने फक्त 31 धावा केल्या. रोहित शर्मा (India versus England ODI series 2025 ) इंग्लंड विरुद्ध एक दिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून आपले मागील अपयश विसरण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

  • मोहम्मद शमी: मोहम्मद शमी विश्व कप 2023 नंतर दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. मागील एक वर्षापासून तो क्रिकेटच्या मैदाना बाहेर होता. दुखापतीतून बरा झाल्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या t20 सामन्यांच्या मालिकेत खेळण्याचे संधी मिळाली. त्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे.

इंग्लंडचे प्रमुख खेळाडू:

  • जो रूट : 2024 मध्ये जो रूट चे प्रदर्शन अतिशय शानदार राहिले आहे. त्याने 17 कसोटी सामन्यात 1556 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या सहा शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
  • हॅरी ब्रुक : इंग्लंड संघाचा युवा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रूक 2024 मध्ये अतिशय शानदार फार्ममध्ये आहे. त्याने 2024 मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आठ शतक केले . त्यात त्याच्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात मुलतान येथे 317 गवांचा समावेश आहे. इथे 2024 मधील सर्वाधिक व्यक्तिगत खेळी आहे.
  • फिलिप सॉल्ट: इंग्रज संघाचा सलामी फलंदाज फिलिप सॉल्ट याने 2024 मध्ये वेस्ट इंडिज संघ विरुद्ध लागोपाठ दोन t20 सामन्यात शतकिय खेळी करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. परंतु आत्ताच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी सिरीज मध्ये फिलिप सॉल्ट मोठी खेळी करू शकलेला नाही.

इम्पॅक्ट प्लेयर (भारत)

  • हार्दिक पांड्या: भारताचे प्रमुख ऑलराऊंडर पैकी एक. विस्फोटक बॅटर आणि प्रभावी बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी सिरीज मध्ये त्याने बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे.
  • रवींद्र जाडेजा: भारतीय संघातील अतिशय महत्त्वाचा खेळाडू म्हणून रवींद्र जडेजाची ओळख आहे. तो बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रात महत्त्वाच्या योगदान देतो.
  • अक्षर पटेल: भारतीय संघातील बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून अक्षर पटेल चे योगदान महत्त्वपूर्ण आहे. 2024 t -20 विश्व कप स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता.
  • ऋषभ पंत: टीम इंडियाचा विस्फोटक विकेट किपर रिषभ पंत याने कार एक्सीडेंट मध्ये झालेल्या दुखापतीत सावरत t20 2024 वर्ल्ड कप स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले आहे. जवळपास पंधरा महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्या पंत ने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघाला t20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याच्या बॅटिंग आणि विकेट कीपिंग चे मोलाचे योगदान आहे.

इम्पॅक्ट प्लेयर (इंग्लंड)

  • लीयम लिविंगस्टोन: लियाम लिविंगस्टोन इंग्लंड संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो त्याच्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यात त्याची भूमिका महत्वाची असते.
  • जोश बटलर: जोश बटलर त्याच्या तुफान फटकेबाजी बद्दल प्रसिद्ध आहे. एक दिवसीय सामन्यात इंग्लंड संघाच्या प्रमुख खेळाडू. त्याचा एक दिवसीय सामन्यातील रायगड 120.01 असा आहे. आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याची कामगिरी इंग्लंड संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
  • जोफ्रा आर्चर: जोफ्रा आर्चर इंग्लंड संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. तो त्याच्या वेगवान गोलंदाजी साठी ओळखला जातो. परंतु मागील काही महिन्यांपासून तो दुखापती मुळे क्रिकेट खेळलेला नाही. परंतु त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील.