ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. या स्पर्धेचा 27 वर्षे जुना इतिहास आहे. या स्पर्धेत आयसीसीच्या सर्व सदस्य टीम सहभागी होतात म्हणून चॅम्पियन ट्रॉफीला मिनी वर्ल्ड कप या नावाने देखील ओळखले जाते. कधी आतंकी हमला तर कधी कोरोनामुळे रद्द झालेल्या या स्पर्धेचा जाणून घेऊया ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास.

history of “champions trophy”- चॅम्पियन्स ट्रॉफी चा इतिहास:

चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात:

ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास : वर्ल्ड कप नंतर क्रिकेट विश्वात चॅम्पियन्स ट्रॉफी ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेचे टूर्नामेंट आहे. याची सुरुवात आयसीसी ने सन 1998 साली केली होती. सुरुवातीस ही स्पर्धा “आयसीसी नॉक आउट टूर्नामेंट” या नावाने ओळखले जात होती. 2002 मध्ये या स्पर्धेस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे नाव दिले गेले. ही स्पर्धा एक दिवसीय (ODI) स्वरूपात खेळली जाते. सुरुवातीस दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा क्रिकेटच्या भरगच्च कॅलेंडर मुळे दर चार वर्षांनी घेण्याची आयसीसी ने घोषणा केली. याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे टी-20 क्रिकेट ची लोकप्रियता जास्त प्रमाणात वाढल्याने आयसीसी ने टी ट्वेन्टी आणि वन डे क्रिकेट स्पर्धांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. आयसीसी ने 2013 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 2017 मध्ये तिचे पुन्हा आयोजन करण्यात येऊन दर चार वर्षांनी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे या स्पर्धेसही विश्वकप स्पर्धे इतकेच महत्त्व राहील.

ICC Champions Trophy 2025:  चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास

icc champions trophy, credit: wikipedia

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू करण्याचा उद्देश्य :

ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास ICC champions trophy- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू करण्याचा मुख्य उद्देश ज्या देशात टेस्ट क्रिकेट खेळले जात नाही, तेथे क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता पैसे एकत्रित करणे हा होता. पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी Champions trophy जून 1998 ला बांगलादेशात आयोजित करण्यात आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफी चे स्वरूप:

चॅम्पियन्स ट्रॉफी( Champions trophy ) मध्ये आयसीसी रँकिंग मधील सर्वोत्तम आठ संघ सहभागी होता. दोन ग्रुप मध्ये प्रत्येकी चार – चार संघांची विभागणी होते. चॅम्पियन्स ट्रॉफी दोन स्टेजमध्ये खेळवली जाते. ग्रुप स्टेज आणि नॉक आउट स्टेज. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागतात. नॉक आउट स्टेजमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला किमान दोन सामन्यात विजय मिळवावा लागतो. या स्पर्धेत फक्त सर्वोत्तम संघ सहभागी होत असल्याने सामने अत्यंत चुरशीचे होतात. ही स्पर्धा क्रिकेटमध्ये चांगली स्पर्धात्मकता आणि रोमांच निर्माण करणारी आहे.

ICC champions trophy (चॅम्पियन्स ट्रॉफी) 2025 चे वेळापत्रक:

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना गत विजेत्या पाकिस्तान संघाचा न्युझीलँड संघाविरुद्ध दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ला कराची येथे होणार आहे. राजनीतिक तणाव व सुरक्षा कारणांमुळे भारताचे सर्व सामने युएई येथे खेळले जाणार आहेत. फायनल साठी भारतीय संघ पात्र ठरला तर तो सामना सुद्धा युएई येथेच खेळवला जाणार आहे. स्पर्धेत पात्र ठरलेल्या आठ संघांची दोन ग्रुप मध्ये विभाग केली आहे. पहिल्या ग्रुप मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या ग्रुप मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

ICC champions trophy time table

icc champions trophy वेळापत्रक. image source: sports trigger

चॅम्पियन्स ट्रॉफी किती वेळा रद्द करण्यात आली?

  • सन 2009 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान येथे आयोजित केली होती. परंतु श्रीलंका संघावर तेथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर संघांनी पाकिस्तान जाणे टाळल्याने 2009 सालची चॅम्पियन ट्रॉफी रद्द करून 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली.
  • सन 2021 मध्ये वैश्विक कोरोना महामारीच्या कारणामुळे आयसीसी ने चॅम्पियन ट्रॉफी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील सर्वात यशस्वी संघ

ICC champion trophy मध्ये सर्वात यशस्वी दोन संघ आहेत. पहिला संघ ऑस्ट्रेलिया आणि दुसरा भारत. दोन्ही संघांनी दोन दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी चे विजेतेपद पटकावले आहे. सन 2002 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वा खालील भारतीय संघ श्रीलंका संघासह संयुक्त विजय घोषित करण्यात आला होता. लागोपाठ दोन फायनल सामने पावसामुळे रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सन 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा फायनल मध्ये पाच धावांनी पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना फक्त वीस ओवरचा खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियन संघाने रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वात सन 2006 व 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

https://www.instagram.com/reel/DFlDcARBkLf/?igsh=aGg1cWZpdzd4c2c0

चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 ते 2017 पावतो विजेता व उपविजेता संघांची नावे खालील प्रमाणे:

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत- पाकिस्तान (Rivalry) रायवलरी:

ICC champions trophy च्या इतिहासात भारत – पाकिस्तान एकूण पाच सामने झाले आहेत. त्यापैकी पाकिस्तान संघाने तीन व भारतीय संघाने दोन सामन्यात विजयी झाले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी भारत पाकिस्तान हेड टू हेड:

  • सन 2004: पाकिस्तान संघ तीन विकेट्सने विजयी
  • सन 2009: पाकिस्तान 54 धावांनी विजयी
  • सन 2013: भारत आठ विकेट्स ने विजयी
  • सन 2017: भारत 124 धावांनी विजयी
  • सन 2017 फायनल: पाकिस्तान धावांनी विजयी

Top 5 batsman in champions trophy

  • ख्रिस गेल (Chris Gayle): वेस्टइंडीज चा माजी विस्फोटक सलामी फलंदाज ख्रिस गेल हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 17 सामन्यात 52.73 च्या सरासरीने एकूण 791 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या तीन शतक आणि एका अर्ध शतकाचा समावेश आहे.
  • महेला जयवर्धने: श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 22 सामन्यात 41.22 च्या सरासरीने एकूण 742 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या पाच अर्ध शतकांचा समावेश आहे.
  • शिखर धवन: भारताचा शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दहा सामन्यात 70.88 च्या सरासरी एकूण 701 धावा केल्या आहेत. यात त्याच्या तीन शतक आणि तीन अर्ध शतकांचा समावेश आहे.
  • कुमार संघकारा: श्रीलंकेचा माजी विकेट किपर फलंदाज कुमार संघकारा याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण 22 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 37.94 च्या सरासरी एकूण 683 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एक शतक आणि चार अर्धशतकचा समावेश आहे.
  • सौरव गांगुली: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण तेरा सामन्यात 73.88 च्या सरासरीने एकूण 665 धावा केल्या आहेत. यात त्याच्या तीन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

Top 5 bowler’s in Champion Trophy

  • काईल मिल्स: न्यूझीलंडचा माजी गोलंदाज काइल मिल्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने पंधरा सामन्यात 17.25 च्या सरासरी एकूण 28 विकेट्स घेतले आहेत. तीस रन देऊन चार विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • लसिथ मलिंगा: श्रीलंकेचा जलद गती गोलंदाज लसिथ मलिंगा हा चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 16 सामन्यात 30.64 च्या सरासरीने एकूण 25 विकेट्स घेतले आहेत. 34 रन देऊन चार विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • मुथय्या मुरलीधरन: श्रीलंकेचा महान स्पिनर मुथय्या मुरलीधरन हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सतरा सामन्यात 30.16 च्या सरासरीने एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत. 15 रन देऊन चार विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • ब्रेट ली: ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट बॉलर ब्रेट ली हा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 16 सामन्यात 26.86 च्या सरासरीने एकूण 22 विकेट्स घेतले आहेत. 38 धावा देऊन तीन विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • ग्लेन मॅक्ग्रा: ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्रा हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्स च्या लिस्ट मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने बारा सामन्यात 19.61 च्या सरासरीने एकूण 21 विकेट्स घेतल्या आहेत. 37 रन्स देऊन पाच विकेट्स ही त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

सर्वाधिक वैयक्तिक स्कोर:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी च्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक स्कोर करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या नेथन अस्टर याच्या नावावर आहे. 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याने युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) संघा विरुद्ध 151 बॉल मध्ये नाबाद 145 धावा केल्या होत्या.

एका सामन्यात सर्वाधिक विकेट:

चॅम्पियन्स ट्रॉफी च्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा कारणामा श्रीलंकेच्या परवीझ महारुफ याच्या नावावर आहे. 2006 मध्ये श्रीलंका व वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या सामन्यात महारुफ याने 14 रन्स देऊन सहा विकेट्स घेऊन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या मान मिळवला.